दिनांक 17 जून आणि 18 जून 2023 रोजी रानमाणुस आणि टीम आयोजित ‘देवराय’ हा उपक्रम पार पडला .
दोन दिवस मांगर Farmstay च्या परिसरात महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक निसर्ग प्रेमींनी community living मध्ये सहभाग घेतला होता . ‘कोकणातील जंगल म्हणजे वृक्ष लागवड नव्हे तर कोकण हीच एक देवराई..!!’ हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत ह्या दोन दिवसात – १)पवित्र आणि दुर्मिळ वनस्पतींच्या बियांचे संकलन आणि वृक्षारोपण २) नैसर्गिक अधिवास पुनरुज्जीवन
३) जंगली जीवनातील पर्यावरणीय संशोधन टूर
४) डिस्कवरी ऑफ रानमाणुस (डॉक्युमेंटरी)
५) सदाहरित जंगलाची भ्रमंती
६) देवराय आणि जैवविविधतेच्या अभ्यासासाठी केलेला ट्रेल
असे अनेक उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये या सगळ्या विषयाची सखोल माहिती प्रत्येकाला मिळण्यासाठी इकॉलॉजिकल हॅबिटॅट रेस्टोरेशन (ecological habitat restoration) या विषयावर श्री. मिलिंद पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे रोल ऑफ इंडिजीनियस कम्युनिटी इन कंजर्वेशन (role of indigenous communities in conservation) या विषयावर श्री विठ्ठल शेळके यांनी आपल्या अनुभवातून व शिक्षणातून महत्त्वाची माहिती प्रत्येकापर्यंत पोहचवली.
देवाच्या नावाने माणसाच्या हितासाठी राखून ठेवलेली ‘देवराई’ हीच आता निसर्गाचा ताळमेळ साधण्यासाठी शिल्लक राहिली आहे. झाडांमध्ये देव शोधणारे आपले पूर्वज यांच्यामुळे ही देवराई तयार झाली. अनेक दुर्मिळ झाडे ही या देवराईत आपल्याला आढळतात. मात्र माणसाच्या अतिहाव्यासा मुळे ही झाड आता प्रत्येक गावातून नष्ट होत चाललेली आहेत. आणि म्हणूनच गावाचा खरा जैविक वारसा जपण्यासाठी , नैसर्गिक साखळी सुरळीत चालण्यासाठी , आणि पर्यावरण रक्षणासाठी एक खारीचा वाटा उचलण्यासाठी हा देवराई उपक्रम राबवून यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.