आजकाल जो तो म्हणतो मला गावात येऊन निसर्गात घर बांधून जुन्या जीवन शैलीत जगायचे आहे पण खरच आपल्याला निसर्गात जगण्याचे तंत्र माहीत आहे का?आपल्याला मातीचे घर बांधता येते का? नैसर्गिक शेती कळते का? ऋतू प्रमाणे शेती , Ecological farming,आणि जीवन शैलीतील बदल निसर्गातल्या seasonal गोष्टी वापरून कसे जगावे? ह्या सगळ्याचे ज्ञान आणि कौशल्य नसेल तर आपण गावात येऊन शहरी जीवन शैली जगणार आहोत का? आपल्याला कोकण चे शहरीकरण करायचे नाही तर इथल्या समृद्ध निसर्गाला साजेशी समृध्द जीवन शैली आत्मसात करून जगायचे आहे.
गावात जगण्यासारखे दुसरे सुख कोणतेच नाही पण तेव्हाच जेव्हा तुम्हाला बाहेरच्या जगावर अवलंबून न राहता स्वतःच्या जागेतील संसाधनांचा पुरेपूर उपयोग करून सुंदर सुशेगाद जीवन कसे जगावे ह्याचे तंत्र माहीत असेल …
आजच्या घडीला त्यासाठी लागणारी कला कौशल्ये (Sustainable living techniques) हरवत चालली आहेत म्हणूनच आपण community उभी करताना त्यातील प्रत्येकाला जीवन प्रणाली समजून देऊन ती शिकवणे गरजेचे आहे.. हे जीवन जगण्यासाठी लागणारी कौशल्ये शिकणे , ती document करणे आणि मागच्या पिढीकडून घेऊन पुढच्या पिढी मध्ये रुजवणे हे काम खूप महत्त्वाचे आहे..
आपण ह्या पुढे असेच Sustainable Living Techniques शिकवणारे workshops कोकणातील गावांमध्ये घेणार आहोत.
ह्याची सुरुवात Zolambe ह्या Ecosensitive झोन मध्ये येणाऱ्या गावातून करत आहोत…
पहिला Workshop नैसर्गिक शेती वरती आहे…आपण जंगल आणि वाहत्या नदी वर आधारित शेती पद्धती समजून घेणार आहोत
शाश्वत जीवनशैली चे अभ्यासक श्री. पांडुरंग राणे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत